MP Udayanraje Bhosale esakal
सातारा

उदयनराजेंच्या कारभारावर शिवेंद्रसिंहराजे नाराज; खासदारांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी तसेच खासदार उदयनराजे यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली होती.

गिरीश चव्हाण

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानकपणे सातारा पालिकेत दाखल झाले. ते आल्याचे समजताच पालिका अधिकारी, पदाधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. पालिका प्रवेशव्दाराजवळच मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी अल्पकाळ चर्चा करत ते पुन्हा मार्गस्थ झाले. (MP Udayanraje Bhosale Met On The Office Bearers Of The Corporation Satara News)

कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने सातारा पालिकेच्या कारभारावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी तसेच खासदार उदयनराजे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या भाषेत टिका केली होती. या टिकेच्या पार्श्‍वभूमीवरच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास पालिकेत दाखल झाल्याची चर्चा या निमित्ताने पालिका परिसरात सुरु झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी पालिका प्रवेशव्दारावर आली.

गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी तडक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे दालन गाठले. यावेळी त्याठिकाणी उपाध्यक्ष मनोज शेंडे हे देखील उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाचे दार स्वत:हून बंद करुन घेत उदयनराजेंनी एक ते दोन मिनिटे बापट आणि शेंडे यांच्याशी चर्चा केली. यानंतर ते पुन्हा त्याठिकाणाहून बाहेर पडले. बाहेर पडत असताना त्यांच्या पाठीमागे बापट आणि शेंडे हे होते. पालिकेच्या पायऱ्या उतरत असतानाच उदयनराजेंनी त्या दोघांशी अल्पकाळ चर्चा केली. या चर्चेनंतर उदयनराजे पुन्हा मार्गस्थ झाले. उदयनराजेंनी बापट, शेंडे यांच्याशी काय चर्चा केली याचा तपशील समजू शकला नाही.

Maratha Reservation : काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक; सहा युवकांची जामिनावर मुक्तता

MP Udayanraje Bhosale Met On The Office Bearers Of The Corporation Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates Live: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

SCROLL FOR NEXT