Udayanraje Bhosale esakal
सातारा

Style Is Style : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग

गिरीश चव्हाण

उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो.

सातारा : वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आज पुन्हा एकदा बाईक राईडमुळे (Bike Ride) चर्चेत आले. कार्यकर्त्याची दुचाकी ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागाची रपेट करत विकासकामांची उद्घाटने केली.

उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेले बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेले गाणे, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे. मध्यंतरीच्या काळातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना "कार्यकर्ते हेच माझे मंत्रिमंडळ" असे व्यक्तव्य करत त्यांनी कार्यकर्ते माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले होते. आलिंगन देत उदयनराजे कार्यकर्त्याला आपलेसे करतात.

Udayanraje Bhosale

गेले काही दिवस उदयनराजे हे सातारा येथील विविध विकासकामे मार्गी लावत आहेत. आज देखील त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार होते. यासाठी ते 007 या क्रमांकाच्या अलिशान चारचाकीतून जलमंदीर पॅलेस येथून बाहेर पडले. त्यांच्या पुढेमागे अनेक कार्यकर्ते दुचाकी घेऊन होते. वाटेत एक कार्यक्रम उरकल्यावर उदयनराजे यांनी चारचाकी सोडून कार्यकर्त्याच्या दुचाकीचा ताबा घेतला. कार्यकर्त्याला पाठीमागे बसवत दुचाकीचे सारथ्य स्वतः करत उदयनराजे यांनी नंतर शहरात चक्कर मारत इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. यामुळे उदयनराजे आणि त्यांची बाईक राईड पुन्हा एकदा चर्चेत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT