सातारा

सातारच्या हद्दवाढीबाबत उदयनराजेंची 'ही' भावना; या नेत्याला दिले सर्व 'श्रेय'!

उमेश बांबरे

सातारा : ऐतिहासिक सातारा शहराची प्रलंबित हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे समस्त सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हद्दवाढीचा  प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला गेला, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

सातारा शहराच्या हद्दवाढीस आज (ता. ८) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली. यासंदर्भात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पेजवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. उदयनराजेंनी म्हटले की, सातारा शहर मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिध्द आहे. सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची हद्दवाढ 1977 पासून प्रलंबित होती. तथापि, 1997-98 मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास अनेक कारणाने अडथळे निर्माण झाले होते. महत्वाचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेचा ठराव हद्दवाढीला पारित होणे आवश्यक होते. तो पारित करून हद्दवाढीतील सर्वांत मोठा अडसर दूर करण्यात आला होता. 

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हद्दवाढीसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्यात पोहोचला गेला. तसेच उत्तरेस मौजे करंजेचा वेण्णानदीपर्यंतचा भाग, तर दक्षिणेस नवीन हायवेच्या किल्याकडील भागासह संपूर्ण अजिंक्यतारा किल्याचा समावेश शहर हद्दीत झाला आहे. तर पश्चिमेस यवतेश्वरच्या पायथ्यापर्यंत दरेखुर्द पर्यंतचा संपूर्ण भागाचा समावेश नगरपरिषद हद्दीमध्ये झाला आहे. पूर्वी नगरपरिषदेचे क्षेत्र 8.15 स्के.कि.मी. होते. या मंजूर हद्दवाढीमुळे ते आता 25.91 स्के.कि.मी. इतके झाले आहे. नवीन भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झाल्याने लोकसंख्या सुमारे दोन लाख झाली आहे. 

सातारा शहर हद्दीलगत असणा-या उपनगरातील बहुतांशी सर्व नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता सातारा शहरात येत असतात. या तरंगत्या लोकसंख्येचा फार मोठा बोजा नगरपरिषदेवर पडत होता. आता हद्दवाढ झाल्याने नगरपरिषदेच्या विस्ताराला वाव मिळाला आहे. नवीन लोकसंख्या आणि भागाचा समावेश नगरपरिषदेत झाल्याने या भागातील सर्व नागरीकांना मुलभूत सोयी सुविधेकरिता यापुढे नगरपरिषदेला विचारणा करता येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सातारा शहरात प्रवेश करताना, ग्रामपंचायत हद्दीत आणि त्रिशंकू भागातील कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

रस्ते, गटर, पाणी, दिवाबत्ती आदी सुविधांसह आता जुने आणि नवीन समाविष्ट नागरिक यांच्या सर्वांगीण विकासाकरिता नियोजनबध्द प्रयत्न केले जातील. सातारा शहरातील ग्रेडसेपरेटर, सातारचे मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढवणे, शहराची हद्दवाढ आदी कामांचा पाठपुरावा करुन त्यास वाचा फोडल्यामुळेच हे प्रश्न पुढे मार्गी लागले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : संसद परिसरात एनडीए, इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT