Udayanraje Bhosale esakal
सातारा

राजकारण्‍यांनी श्रेयवादापासून दूर हवं, अन्यथा..; उदयनराजेंचा इशारा

गिरीश चव्हाण

'श्रेयवादाची मानसिकता कोणीही बाळगू नये. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे.'

सातारा : महसूल राज्यमंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत कण्हेर उद्‍भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सत्तापालट झाला व श्रेयवादातून ही चांगली योजना बासनात गुंडाळली गेली. योजनेकडे दुर्लक्ष झाल्‍याने शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांना हक्काच्‍या पाण्‍यापासून सुमारे २० वर्षे वंचित राहावे लागले, याची खंत आहे. देर है लेकिन अंधेर नही है याचे समाधान असल्‍याचे सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट करत विरोधी गटावर निशाणा साधला.

कण्‍हेर योजना लोकार्पणाबाबतच्‍या उदयनराजेंनी पत्रकात म्‍हटले आहे, की कण्हेर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Kanher Regional Water Supply Scheme) त्‍याकाळी मार्गी लागली असती, तर त्‍यासाठी फक्‍त १६ कोटी लागले असते. त्यातून शाहूपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतींसह योजना मार्गावरील १८ गावांना फायदा झाला असता. १९९९ मध्‍ये सत्ताबदल झाला. त्यानंतर योजनेसाठी आम्‍ही अनेक वेळा विनंती- आर्जव केले. मात्र, आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतूने ही चांगली योजना गुंडाळण्‍यात आली. ही योजना नंतरच्‍या काळात आम्‍ही मार्गी लावली.

नागरी सुविधा देताना श्रेयवादाची मानसिकता कोणीही बाळगू नये. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. राजकारण्‍यांनी श्रेयवादापासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. सकारात्‍मक, व्‍यापक दृष्‍टिकोन ठेवत आम्‍ही नेहमी चालतच राहिलो. (कै.) दादामहाराज ऊर्फ प्रतापसिंह महाराज (Pratapsingh Maharaj) यांचा हा मार्गदर्शक पायंडा आहे. कण्हेर योजनेतून शाहूपुरीकरांना पाणी देऊ शकलो, याचा आनंद असल्‍याचेही त्‍यांनी पत्रकात नमूद करत नाव न घेता श्रेयवादाच्‍या कारणावरून विरोधी गटावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT