Udayanraje Bhosale esakal
सातारा

'हा' प्रश्न विचारताच उदयनराजे पत्रकारांवर खवळले

उमेश बांबरे

राजकीय दबावाला बळी पडून बँकेनं जरंडेश्वरला कर्ज वाटप केलंय, असं म्हणायचं आहे का?

सातारा : कर्ज वाटपात अनियमितता आहे, यावर तुम्ही ठाम आहे का? यावर उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) म्हणाले, मला माहिती नाही. मला माहिती असतं तर मी शेपूट घालून बसणारा नाही. मी सर्वांपुढे सर्वकाही उघडपणे सांगितलं असतं. मी आजपर्यंत तत्वे जपली आहेत. तत्वाला गालबोट लावून घेणार मी नाही. समजा जरंडेश्वरच्या (Jarandeshwar Factory) कर्जाची वसुली निघाली तर सगळे म्हणणार की हे ही भ्रष्ट आहेत. माझं तर म्हणणं आहे की, या सर्व माणसांचं दहा वर्षांचे रेकॉर्ड पहा त्यावरून लक्षात येईल कोण कसं वागलं. काही झालं की उदयनराजेंकडे येतात, न्याय द्या म्हणतात. मी दबाव टाकतो का, मी समाजाच्या 'पे स्केल'वर आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, ज्या राजघराण्यात जन्माला आलो त्याची मला जाण आहे. जिल्हा बँकेत हे निवडून जातात ते चालतं, पण आम्ही निवडून गेलो की जागा अडवली म्हणतात. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी येत्या दहा तारखेच्या आत आपले अर्ज मागे घ्यावेत. तसं झालं तर माझी सपशेल माघार असेल, असं आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना(MLA Shivendrasinharaje Bhosale) केलं.

राजकीय दबावाला बळी पडून जिल्हा बँकेनं जरंडेश्वरला कर्ज वाटप केलंय, असं म्हणायचं आहे का? या प्रश्नावर उदयनराजे पत्रकारांवर (Journalist) भडकले. ते म्हणाले, काय...येड्या सारखं बोलताय. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही. प्रश्न विचारताना भान ठेवा. आम्ही जे-जे बोलतो ते तुम्ही लोकांपर्यंत पोचविता. समजा, उदयनराजे खोटे किती व खरे किती बोलतात हेच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. अन्यथा, बँकेतील शेतकरी सभासद देशोधडीला लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT