सातारा

आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी या १० योजना सुरु करा, उदयनराजेंची मागणी

उमेश बांबरे

सातारा : मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्यात, जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषत: ज्या दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हॉस्टेलची सुविधा, तसेच नामांकित शाळांत गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खासबाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती दिली असली, तरी यावर निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाला सवलती व विविध योजना लागू कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून उदयनराजे यांनी म्हटले की, या समाजासाठी पुढील योजना तातडीने लागू कराव्यात. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना ''स्वयं'' योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा, गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा, ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत. 

तसेच सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १००० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या, मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या, या समाजातील युवक-युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलिस भरतीत आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून द्यावी. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती आणि शेतकरी कुटुंबास विमा संरक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा या आदी मागण्या देण्याची सूचना उदयनराजेंनी केली आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून ठोस कृती करावी, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत वरील मागण्यांसह इतर समाजाप्रमाणे मराठ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करून त्यांना छोट्या उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बेरोजगार तरूण-तरूणींना भत्ता सुरू करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT