सातारा

एक दाेन नव्हे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून चाेरांनी मारला तांब्याच्या तारांवर डल्ला

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) हद्दीतील कोपीचा माळ, सुरूर (ता. वाई) हद्दीतील हेळा शिवार व पवार वस्ती असे महावितरणचे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून, त्यातील ऑइल व तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या तोडफोडीने महावितरणचे सुमारे दहा ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
कोपीचा माळ, वेळे (ता.वाई) व चव्हाण, सुरूर (ता. वाई) अशा तीन ठिकाणच्या ट्रान्स्फॉर्मरवरील शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करून अज्ञात चोरट्यांच्या टोळीने ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड केली. ट्रान्स्फॉर्मरवरील लोखंडी व विजेचे साहित्य अस्ताव्यस्त टाकून त्यातील ऑइल व तांब्याच्या तारा चोरून नेल्या. यामुळे महावितरणचे सुमारे दहा ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तसेच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरीची भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
या चोऱ्यांमुळे वीज जावून शेतकऱ्यांचे, तर ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड होऊन साहित्य जात असल्याने महावितरणचेही मोठे नुकसान होत आहे. या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांबरोबरच महावितरणचे कर्मचारीही चांगलेच त्रासून गेले आहेत. या चोऱ्यांच्या प्रकारामुळे कवठे परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून कवठे परिसरातील ट्रान्स्फॉर्मर फोडून ऑइल व तांब्याच्या तारा चोरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. पोलिसांनी या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ना नफा ना तोटा या तत्त्वावर शाळा सुरु ठेवा; फी वाढ करू नका

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT