सातारा

वीज वितरण कंपनीच्या पंचवीस वर्षीय शाखा अभियंत्याची किन्हईत आत्महत्या

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयात अभियंत्याने गळफास घेतल्याचे रविवारी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सूरज सुधीर देसाई (वय 25, मूळ रा. वडिलगे, ता. गारगोटी, जि. कोल्हापूर, सध्या रा. एकंबे रोड, कोरेगाव) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
 
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, की पेठ किन्हई येथे वीज वितरण कंपनीचे शाखा कार्यालय आहे. या ठिकाणी सूरज देसाई हे चार-पाच महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रूजू झाले होते. दरम्यान, रविवारी सकाळी आठच्या सुमारास शाखा कार्यालयामध्ये सूरज हे गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. माहिती कळवल्यानंतर सातारारोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस अधिकारी रितू खोखर यादेखील तेथे पोचल्या.

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे उद्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

दरम्यान, या घटनेची माहिती सूरज यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. दुपारी नातेवाईक आल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सूरज यांच्या खिशात चिठ्ठी सापडली; मात्र त्यातील तपशिलाबाबतची माहिती समजू शकली नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे; परंतु त्याबाबतची अधिकृत माहिती पुढे आली नाही. दरम्यान, रविवार असूनही एवढ्या सकाळी शाखा कार्यालयात सूरज हे गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT