सातारा

पुणे- मुंबईला जाणा-या प्रवाशांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

प्रशांत घाडगे

सातारा : पुणे व मुंबई शहरांत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने सातारा शहरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सातारा आगारातून जाणाऱ्या दुपारच्या सत्रातील काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. एसटी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाउन झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रित आल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून वाहतूक सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर आगारात प्रवाशांची संख्याही वाढल्याने एसटी फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. तसेच लांब पल्ल्याच्या 20 शिवशाही बसही सुरू करण्यात आल्या होत्या. काही महिनेच हे नियोजन सुरू राहिले.

गेल्या महिनाभरापासून कोरोना ससंर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, बोरिवली, विनावाहक सातारा-स्वारगेट या मार्गावर जाणाऱ्या बसचा समावेश आहे. मुंबई मार्गावर दर दोन तासांनी बससेवा, तर सातारा-पुणे विनाथांबा बससेवा दर 30 मिनिटांनी सुरू असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, असेही आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. 

मागील काही दिवसांत मुंबई व पुणे शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने दुपारच्या सत्रातील काही फेऱ्या कमी केल्या आहेत अशी माहिती रेश्‍मा गाडेकर, सातारा आगारप्रमुख (कनिष्ठ) यांनी दिली. 

एक आसन एक प्रवासी नियम लागू करा 

लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात एसटीची वाहतूक सुरू केली. मात्र, कोरोनात खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासादरम्यान एक आसन एक प्रवासी असा नियम केला होता. आता एका आसनावर दोन-तीन प्रवासी बसून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे मुंबई व पुणे शहरांतील वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा एक आसन एक प्रवासी असा नियम लागू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यदलात सरकारी नोकरी करायची आहे?, मग असा भरा अर्ज..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

Chh. Sambhajinagar News: चार पोलिस असूनही विद्यार्थ्याला लुटले; सिडकोतील प्रकार,तीन मुख्य चौकांत लूटमारीच्या वाढत्या घटना

SCROLL FOR NEXT