Railway Sakal
सातारा

Railway : मुंबई ते कोल्हापूर अतिजलद विशेष रेल्वे गाडी धावणार; मध्य रेल्वेने घेतला तातडीने निर्णय

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक एकेरी अतिजलद विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक एकेरी अतिजलद विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मंगळवारी (ता. २०) ही विशेष रेल्वे गाडी धावणार आहे.

मध्य रेल्वेकडुन त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रवाशांची सध्या गर्दी वाढली आहे. त्याचा विचार करुन प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान अतिजलद एकेरी विशेष गाडी क्रमांक (01099) ही मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता ती कोल्हापुरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला पोहचणार आहे.

ती गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर येथे थांबणार आहे. त्या गाडीला १७ डबे जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आजपासुन आरक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT