Dengue
Dengue esakal
सातारा

नागरिकांनी भीती बाळगू नये; डेंगी, चिकुनगुनिया नियंत्रणात!

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : पावसाळ्यात (Rain Season) डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगी (Dengue), चिकुनगुनियासारखे (Chikungunya Virus) रोग पसरू नयेत, यासाठी येथे राबविलेले ‘फाइट द बाइट’ (Fight the Bite) या अभियानातील सर्व्हेनुसार शहरातील ४५ रुग्णालयांत ऑगस्टमध्ये डेंगीचे केवळ पाच, तर चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळला आहे. दोन्ही रोग शहरात नियंत्रणात आहेत. नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर (Health Chairman Vijay Wategaonkar) यांनी केले.

डासांच्या विरोधात मे महिन्यापासून ‘फाइट द बाइट’ अभियान सुरू आहे.

श्री. वाटेगावकर म्हणाले, ‘‘स्वच्छतेच्या दैनंदिन कामासह सार्वजनिक आरोग्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डासांच्या विरोधात मे महिन्यापासून ‘फाइट द बाइट’ अभियान सुरू आहे. मे, जून, जुलै कालावधीत डेंगी व चिकुनगुनियाचा त्रास होतो. त्या विरोधात मोहीम हाती घेतली. आरोग्य विभाग व ग्रीनी टीमचे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. घरोघरी पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन डासांची उत्पत्ती थांबवली गेली. घरातील फ्रीजमध्ये डेंगीच्या आळ्या असतात. त्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.

रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी शहरातील ४५ रुग्णालयांतील अपडेट ग्रीनी टीम घेते. जुलै ते १९ ऑगस्टअखेर डेंगीचे पाच, तर चिकुनगुनियाचा केवळ एक रुग्ण दाखल आहेत. शहर व परिसरात सुमारे ३०० रुग्णालये आहेत. तालुक्यातून व अन्य जिल्ह्यातून रुग्ण दाखल होतात. त्याचा शहराशी संबंध येत नाही. पालिका सातत्याने राबवत असलेल्या डास प्रतिबंधक उपाययोजनांमुळे शहरात या दोन्ही आजार रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. मात्र, या दोन्ही आजारांबाबत विनाकारण नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील दोन महिने जास्त खबरदारी घेण्यात येणार आहे.’’

डेंगी, चिकुनगुनियाचा आजार वाढू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. परिसरात डेंगी, चिकुनगुनियासदृश आजारांची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास पालिकेच्या आरोग्य विभागास माहिती द्यावी. तेथे तातडीने उपाययोजना करण्यात येतील.

-विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT