Sayali Khamkar Sakal
सातारा

Nagthane News : मुलीचा आग्रह... वऱ्हाड आलं रिक्षांमधून!

रिक्षाचालक पित्याच्या कष्टाला लेकीची अशीही अनोखी मानवंदना

सुनील शेडगे

नागठाणे, (जि.सातारा) - रिक्षाचालक असलेल्या वडिलांच्या कष्टाला अनोखी मानवंदना देताना कन्येने आपल्या लग्नाचे वऱ्हाडही रिक्षातून नेण्याचा हट्ट धरला. पित्यानेही तो पुरा करताना आपल्या लेकीचा विवाह सोहळा संस्मरणीय केला. यामुळं आई-वडिलांचाही ऊर भरून आला.

राजेवाडी हे सातारा शहरालगतचे गाव. येथील विजय खामकर हे व्यवसायाने रिक्षाचालक. त्यांची कन्या सायली हिचा विवाह सांगवड (ता. पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी काल झाला. तो सर्वांच्याच लक्षात राहणारा ठरला. त्याचे कारणही अगदी तसेच होते. या विवाहासाठी जमलेली वऱ्हाडी मंडळी चक्क रिक्षातून विवाहस्थळी दाखल झाली.

आपल्या वडिलांचे आयुष्य कष्टात गेले. रिक्षा व्यवसायातून कुटुंबाला स्थैर्य लाभले, या भावनेतूनच सायलीने विवाहासाठी येणारी वऱ्हाडी मंडळी रिक्षातून न्यायचा आग्रह धरला. यातून तिने आपल्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीने जणू सलामच केला. सुमारे २० रिक्षांतून ही वऱ्हाडी मंडळी साताऱ्यातील मंगल कार्यालयात दाखल झाली.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने सजविलेल्या रिक्षांचा ताफा पाहून ये- जा करणारेही बुचकळ्यात पडले होते. यामागची पार्श्वभूमी समजताच साऱ्यांनीच सायलीचे, तिच्या वडिलांचे तसेच आई नीता, भाऊ हर्षद, शुभम आदींचे कौतुक केले. या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक यांच्या दृष्टीनेही हा विवाह सोहळाही संस्मरणीय ठरला.

मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणे, यातच त्यांच्या कष्टाचे चीज दडलेले असते. सायलीने हेच दाखवून दिले. आम्हाला तिचा अभिमान वाटतो.

- विजय खामकर, राजेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT