Ajit Pawar vs Shiv Sena leader Vijay Shivtare esakal
सातारा

Ajit Pawar : विजय शिवतारेंच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांचा थेट निशाणा; म्हणाले, वातावरण खराब होईल असं..

विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या वक्तव्याबाबत मला काहीच बोलायचं नाही.

हेमंत पवार

शिवतारे यांनी अजित पवारांनी पालखीतळावर येऊन माफी मागावी, अशीही मागणी केली आहे.

कऱ्हाड : विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या वक्तव्याबाबत मला काहीच बोलायचं नाही. सुसंस्कृतपणा सर्वांनी दाखवावा, असे माझे मत आहे. त्यांच्यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ काय तो निर्णय घेतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप या तिन्ही पक्षांसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल असे कोणतेही वक्तव्य करु नये, अशी माझी भावना आहे, अशा शब्दांत विजय शिवतारे यांच्या वक्तव्याबाबत निशाना साधत अधिक बोलणे पवारांनी (Ajit Pawar) टाळले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडच्या पालखी तळावरून ‘विजय शिवतारे, तू निवडून कसा येतो, तेच मी पाहतो,’ असे म्हंटले होते. तो शिवतारेंचा अपमान नव्हता, तर पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान होता. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे थेट इशारा शिवसेना (Shiv Sena) नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजितदादांना दिला आहे.

त्याचबरोबर शिवतारे यांनी अजित पवारांनी पालखीतळावर येऊन माफी मागावी, अशीही मागणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आज अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, विजय शिवतारे यांच्या वक्तव्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. त्यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ काय तो निर्णय घेतील. सुसंस्कृतपणा सर्वांनी दाखवावा, असे माझे मत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप तिन्ही पक्षांसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल, असे कोणतेही वक्तव्य कोणीही करु नये, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

निलेश लंकेंची स्पष्ट भूमिका

निलेश लंके यांच्याबद्दल माध्यमांतच चर्चा सुरु आहे, त्यात तथ्य नाही असे सांगुण उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, निलेश लंके यांनी माध्यमांना काय सांगायचे ते सांगितले आहे. मीही त्यांची चर्चा ऐकली आहे. ज्याच्याबद्दल चर्चा सुरु आहे, त्यांनीच उत्तर दिले असताना त्यावर मी उत्तरे देण्याचे काही कारण नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT