Ajit Pawar vs Sharad Pawar esakal
सातारा

NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करूनही आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहिले नसल्याने चर्चेचा विषय ठरले.

सकाळ डिजिटल टीम

खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांच्या आमदार, पदाधिकारी बैठकी काल मुंबईत झाल्या.

सातारा : जिल्हा राष्ट्रवादीतील (NCP) खासदार, दोन आमदारांसह बहुतांशी पदाधिकारी, खासदार शरद पवारांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील सभेस उपस्थित राहात आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले.

तर दोन आमदारांसह फलटण, सातारा, जावळी, खंडाळा, खटावमधील काही पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेस उपस्थित राहिले. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले.

तर आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करूनही आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहिले नसल्याने चर्चेचा विषय ठरले. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांच्या आमदार, पदाधिकारी बैठकी आज मुंबईत झाल्या.

यातील कोणत्या बैठकीला कोण आमदार व पदाधिकारी उपस्थित राहिले, याची दिवसभर जिल्ह्यात उत्सुकता होती. अजित पवारांची बैठक सकाळी अकरा वाजता होती. त्यामुळे या बैठकीस जिल्ह्यातून आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, दीपक चव्हाण यांच्यासह फलटणचे पदाधिकारी, खंडाळ्यातील निम्मे पदाधिकारी, सातारा व जावळीतील पदाधिकारी, खटावमधील पदाधिकारी उपस्थित होते.

तर खासदार शरद पवारांच्या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, तसेच जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकारी, महिला आघाडी, युवती सेलच्या पदाधिकारी आदी उपस्थित होते. सर्वच पदाधिकारी मुंबईला गेल्यामुळे राष्ट्रवादी भवनाला आज पहिल्यांदाच कुलूप लावल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, काल कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असे जाहीर करूनही आमदार मकरंद पाटील बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्ही कालच भूमिका जाहीर केलेली आहे. आमदार मकरंद पाटील हे रुटीनच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेल्याने बैठकीस उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी

किरण साबळे, राजेंद्र नेवसे, सचिन बेलागडे, अमित कदम, नंदकुमार मोरे, रमेश धायगुडे, बंडू ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, अरुण माने, नागेश जाधव, मंगेश धुमाळ, नीलेश कुलकर्णी, संभाजी घाडगे, रमेश शिंदे, बाळासाहेब शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार यांच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी

शशिकांत वाईकर, दीपक पवार, सतीश चव्हाण, शाफिक शेख, राजाभाऊ जगदाळे, संजना जगदाळे, श्रीमंत झांजुर्णे, मानसिंग जगदाळे, देवराज पाटील, सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार, प्रभाकर देशमुख, अजय जगताप, प्रमोद शिंदे, प्रताप पवार, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT