Satara District Bank Election esakal
सातारा

'निवडणुकीत राष्ट्रवादीनेच केला राष्ट्रवादीचा पराभव'

राजेंद्र वाघ

निवडणुकीत आपल्याकडे मतांची संख्या अधिक असतानाही महाडिकांचा चिठ्ठीवर पराभव झाला.

कोरेगाव सातारा : कोरेगावातील विधानसभेच्या व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील (Satara District Bank Election) पराभव समोरच्यांनी केला नाही, तर आपणच आपल्या हातांनी म्हणजे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा (NCP) पराभव केला आहे. आता झालेल्या चुका दुरुस्त करून कोरेगावात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देऊ, कोणी कितीही पैसे घेऊन येऊ द्या हो, कार्यकर्त्यांच्या ताकदीपुढे काही होऊ शकणार नाही, ज्यांना पलीकडे जायचे आहे, त्यांनी आजच जावे, अशांची गरज नाही, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांनी येथे स्पष्ट केले.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नितीन पाटील व संचालक रामभाऊ लेंभे यांचा सत्कार झाला. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी शिवाजीराव महाडिक, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, काकासाहेब गायकवाड, तानाजी मदने, संजय झंवर, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, प्रताप कुमुकले आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी किसन वीर कारखान्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्या वेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी प्राथमिक चर्चा झाली. कोरेगावातून गेल्या वेळी सुनील माने व त्याआधी लालासाहेब शिंदे यांना संधी दिली. आता ज्यांना पक्षाने आतापर्यंत काही दिले नाही, अशांना संधी द्यावी, असे सांगून भगवानराव जाधव व शिवाजीराव महाडिक, असे दोन पर्याय मी अजितदादांपुढे ठेवले होते. चर्चेअंती त्यांनी भगवानतात्या यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली होती. दरम्यान, दुर्दैवाने भगवानतात्या आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यानंतर श्री. महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाली.

या निवडणुकीत आपल्याकडे मतांची संख्या अधिक असतानाही श्री. महाडिक यांचा चिठ्ठीवर पराभव झाला. गेल्या चार-पाच वर्षांत या तालुक्याशी माझा संपर्क कमी झाल्याने पाच- सहा मते माझ्या हातातून गेली. राजकारणात पराभवदेखील होतो. त्यामुळे कोणी निराश होऊ नये. जय, पराजय दोन्ही पचवायचे असतात. आता आगामी काळातही निवडणुका आहेत. तुमच्या ताकदीपुढे काही होऊ शकणार नाही.’’ या वेळी रामभाऊ लेंभे यांचेही भाषण झाले. आमदार शशिकांत शिंदे व नितीन पाटील यांनी समन्वयाचे व बेरजेचे राजकारण करावे, अशी अपेक्षा श्री. महाडिक, श्री. झंवर, सभापती जगदाळे, श्री. गायकवाड यांनी व्यक्त केली. भास्कर कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रताप कुमुकले यांनी आभार मानले.

माजी उपाध्यक्षांवर निशाणा

‘काकांनी आमचा बळी घेतला’ वगैरे प्रकारचे बरेच आरोप या निवडणुकीत माझ्यावर झाले, असे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, ‘‘नितीन पाटलांनी ठरवले असते, तर ते सहा वर्षे उपाध्यक्ष राहिले असते का? यावेळी कोरेगावची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ‘त्यांना’ बँकेत बसून ‘पक्षनिष्ठा हेच आपले भांडवल आहे. कोणाला बळी पडू नका. भविष्यात तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. त्यावेळी मी व आमचे कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे राहू,’ अशा शब्दांत समजून सांगितले होते; पण जे घडायचे ते घडून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT