Sakharwadi Gram Panchayat Election esakal
सातारा

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या भोसलेंचा विजय; राजे गटाला धक्का

दीपक मदने

राजे गटाच्या पुढाऱ्यांनी विक्रमसिंह भोसले यांचा पराभव कसा होईल, याचा चंग बांधला होता.

सांगवी : साखरवाडी ग्रामपंचायतीच्या (Sakharwadi Gram Panchayat Election) पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) विधायक विकास आघाडीच्‍या उमेदवार हेमा विक्रमसिंह भोसले (Hema Bhosle) यांच्याकडून राजे गटाचे राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) हे २८४ मतांनी पराभूत झाले.

साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विक्रमसिंह भोसले (Vikramsingh Bhosale) यांनी दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी दोन्ही ठिकाणाहून विजय संपादन केला होता. एका ठिकाणी त्यांनी आपल्या उमेदवारीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये प्रल्हादराव साळुंखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस विधायक विकास आघाडी विक्रमसिंह भोसले यांच्या गटाची युती होऊन हेमा विक्रमसिंह भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी स्वतः साखरवाडीत येऊन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हेमा भोसले यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस राजे गटाकडे पिंपळवाडी, साखरवाडीतील शंकरराव माडकर, ‘महानंदा’चे उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्यासह अनेक मातब्बर नेते मंडळी राजेंद्र भोसले यांच्याबाजूने उभी असल्याचे चित्र होते.

राजे गटाच्या स्थानिक पुढाऱ्यांनीही विक्रमसिंह भोसले यांचा पराभव कसा होईल, याचा चंग बांधला होता. कार्यकर्त्यांची मोलाची साथ असल्याने साखरवाडीत प्रल्हादराव साळुंखे-पाटील व विक्रमसिंह भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपली ताकद राजे गटाला दाखवण्याचे काम केल्याचे निकालातून दिसते. साखरवाडीच्या कारखान्यावर रामराजे गटाचे वर्चस्व असले तरी येथील जनता विक्रमसिंह व साळुंखे-पाटील यांच्या विचारांशी सहमत असल्याचे चित्र आजच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking: मोहम्मद सिराज - रवींद्र जडेजाला मोठा फायदा! जसप्रीत बुमराह अव्वल क्रमांकावर कायम

Laxman Hake: ''ताणून मारण्याची भाषा मराठा बांधवांसाठी केलीच नव्हती'', लक्ष्मण हाकेंच्या राईट हँडचा सूर बदलला

Latest Marathi News Live Update : नशिराबाद टोल नाक्यावर मध्यरात्री फरशी भरलेला ट्रॉली कलंडली

Crime: विकृती! झोपलेल्या पतीवर भल्या पहाटे उकळतं तेल ओतलं, नंतर जखमांवर मिरची पावडर टाकली अन्...; पत्नी असं का वागली?

Jayant Patil Sangli : जयंत पाटलांना मोठा धक्का! आमदार अरूण लाड यांचे चिरंजीव भाजपमध्ये, चंद्रकांत दादांचे मिशन ZP, पदवीधर

SCROLL FOR NEXT