सातारा

चंद्रकांत पाटलांना आता विश्रांती गरज; जयंत पाटलांचा टाेला

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र, पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे, की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते का मर्यादित ठेवताय. दुसरे काही प्रश्न महाराष्ट्रात आहेत का नाहीत. प्रत्येक वेळी चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याची काहीही आवश्‍यकता नाही. आता चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती द्या, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
 
ते म्हणाले, ""कोरोना प्रादुर्भावाच्या झालेल्या परिणामातून बाहेर पडून सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत. असे असताना सगळीकडे गेल्यावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असे म्हणाले याविषयीच विचारतात. मात्र, फडणवीस आणि पाटील यांच्याशिवायही राज्यात अनेक विषय आहेत. त्यामुळे आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारचे एक वर्षे कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य असेल.''

अंशतः लॉकडाउनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढला; सातारा जिल्हाधिका-यांचा आदेश

मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते का मर्यादित ठेवताय. दुसरे काही प्रश्न महाराष्ट्रात आहेत का नाहीत. प्रत्येक वेळी चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याची आवश्‍यकता नाही. आता चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती द्या, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, धनंजय पिसाळ उपस्थित होते. 


भिडे, एकबोटेंवर कारवाई होणार 

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईसाठी महाविकास आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दोघांविरोधात आरोप दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. त्यामुळे जे पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. त्यांच्यावर काय कारवाई होणार हे त्या विभागाचे मंत्री सांगू शकतील. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्ये आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे; परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटलांचे आश्वासन बोलाची कढी, बोलाचाच भात ठरले; 'जलसंपदा'त कुरबुर 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

SCROLL FOR NEXT