विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला मुकावे लागणार? वाचा काय आहे प्रकरण Sakal
सातारा

NEET Exam : विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला मुकावे लागणार? वाचा काय आहे प्रकरण

विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या अॅडमीशनसाठी नीट परिक्षा देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने नीटचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक केले आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड : विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या अॅडमीशनसाठी नीट परिक्षा देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने नीटचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक केले आहे.

मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेटची प्रोसेस करुनही ते अपडेट होत नाही. अनेकांचे मोबाईल नंबर आधारशी लिंक होत नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आधारच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातही हेलपाटे घातले.

मात्र काहीच कार्यवाही होत नाही. त्यातच निटचे अर्ज भरण्याची मुदत दोनच दिवस म्हणजे शनिवारीपर्यंतच (ता. १६) आहे. त्यामुळे नीटच्या परिक्षेपासुन अशा अनेक विद्यार्थ्यांना वंचीतच रहावे लागणार असल्याने ते व त्यांचे पालक हवालदील झाले आहेत.

नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत नीटची परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांचे देशभरातील प्रवेश नीटमधील गुणांच्या आधारे केले जातात.

परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि विद्यार्थ्यांचे रॅँकिंग देण्याचे काम एनटीएच्यावतीने केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इंग्रजी आणि हिंदीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळी, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. यंदाही ही परिक्षा पाच मे २०२४ रोजी होणार आहे.

त्यासाठी ९ मार्च २०२४ पर्यंत २२ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची नोंद एनटीएकडे झाली आहे. या परिक्षांसाठी अर्ज भरण्याच्या नियम व अटीमध्ये यंदा आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे एनटीएने बंधनकारक केले आहे.

त्यानुसार हे फॉर्म भरावे लागत आहेत. अर्ज भरायला गेल्यावर आधार कार्ड अपटेड करा असे सांगीतले जाते. ते अपडेटसाठी गेल्यावर तेथे अपडेटची सर्व प्रोसेस करुनही ते अपडेट होत नाही. चार-चार महिने त्यासाठी विद्यार्थी, त्यांचे पालक खटपट करत आहेत. त्याचबरोबर अनेकांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक होत नाही.

त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आधारच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातही हेलपाटे घातले आहेत. तरीही काहीच कार्यवाही होत नसल्याने पालकही हतबल झाले आहेत. त्यातच निटसाठी फॉर्म भरण्याची मुदत शनिवारीपर्यंत आहे. त्यामुळे नीटच्या परिक्षेपासुन अशा अनेक विद्यार्थ्यांना वंचीतच रहावे लागुन त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एनटीएकडे अनेक तक्रारी दाखल

केंद्रीय शिक्षण विभागाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यंदा नीट परिक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी असलेल्या नियम व अटीमध्ये आधार कार्ड अपडेट असणे, ते मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत.

ते अपडेट झाले तरी त्यांचे मोबाईल आधारशी लिंक होत नाहीत अशा तक्रारी केंद्रीय शिक्षण विभागाकडे दाखल झाल्याचे एनटीएच्या दिल्लीतील कार्यालयातुन सांगण्यात आले. त्यामुळे ज्यांच्या अशा तक्रारी आहेत त्यांच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अन्य पर्याय देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत. त्याचबरोबर ते मोबाईशीही लिंक होत नाही. त्यासंदर्भात अनेक पालकांनी माझ्याकडे धाव घेतली आहे. मी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहुन या अटीमध्ये बदल करावा किंवा त्याला अन्य काही पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती केली आहे.

- श्रीनिवास पाटील खासदार, सातारा

नीटचा फॉर्म भरण्यासाठी यंदापासुन आधारकार्ड लिंक असणे बंधनकारक केले आहे. अर्ज भरायला गेल्यावर आधार अपडेट करायला सांगीतले. ते अपडेट करण्याची कार्यवाही मी डिसेंबर २०२३ रोजी पुर्ण केली. तरीही आधार नंबर नॉट व्हॅलीड असेच येत आहे. त्यामुळे त्याचा नीटचा अर्ज भरता येत नाही. त्यासाठी मी मुंबईतील राज्यातील आधारच्या मुख्य कार्यालयात गेलो. मात्र तेथेही होईल-होईल असे सांगतीले. त्याला आज चार महिने झाले तरीही काहीही झालेले नाही. त्यामुळे माझ्या मुलाला या नीटच्या परिक्षेपासुन वंचीत रहावे लागुन त्याचे वर्ष वाया जाणार आहे.

- ब्रह्मदेव वाघमोडे पालक, गोडोली-सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT