सातारा

भिरडाचीवाडीत सापडलेल्या अर्भकप्रकरणी ब्रम्ह गावच्या युवकावर गुन्हा दाखल

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : भुईंजनजीक भिरडाचीवाडी य़ेथे बुधवारी सापडलेले एक दिवसाचे अर्भक हे ऊस तोडणी करणा-या मजूराच्या अल्पवयीन मुलीचे असल्याचे निषन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाची आई  व तिचे आई-वडील यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित कुटुंब आष्टी (जिल्हा बीड) येथील रहिवाशी असून सध्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाऩ्यावर ऊस तोडणीसाठी आले आहेत. या प्रकरणी ब्रम्ह गाव (जि. बीड) येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

भिरडाचीवाडीनजीक देगाव हद्दीतील एका शेतक-यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. त्यावेळी त्यातील एक कामगार लघुशंकेसाठी शेताच्या कडेला असणा-या ओढ्यात गेला असता त्यास लहान मुल रडण्याचा आवाज आला. त्याने ही बाब तेथे ऊस तोडणी करणा-यांना सांगितली असता त्यांनी कारखाना सुरक्षा कर्मचारी राहूल शिंदे यांना सांगितली.

गजा मारणेच्या अटकेनंतर सातारा पोलिसांची पंजाबात दबंगगिरी; पोलिस अधीक्षक म्हणाले, दॅटस् ग्रेट हम यही सुनना चाहते थे! 

राहूल शिंदे यांनी तात्काळ पोलिसांना कळवून घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी एक अर्भक दिसले. संबंधित अर्भकास कपड्यात गुंडाळून पोलिसांसह दुचाकीवरुन जावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांच्या ताब्यात दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्भकावर उपचार करुन त्यास सातारा येथे पाठविण्यात आले. तदनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास गंगावणे, दत्तात्रय धायगुडे, आनंदराव भोसले, रविराज वर्णेकर आदींनी शोध मोहीम राबविली. 

या सर्व प्रकारानंतर राहूल शिंदे सायंकाळी ऊस तोडणी सुरु असलेल्या फडात गेले. तेथील काही कामगारांना विश्वासात घेवून तेथील कोणी काही पाहिले आहे का किंवा कोणी येथून गेले आहे का असे विचारले असता तेथील कामगारांना एक मुलगी दुपारपासून नसल्याचे सांगितले. त्यावर राहूल शिंदे यांनी मुलीच्या आईला व वडीलांना विचारले असता ती आजारी असल्याने दवाखान्यात गेली असल्याचे सांगितले. शिंदे यांनी लागलीच भुईंज येथील दवाखान्यात जाऊन शोधाशोध सुरु केली. एका ठिकाणी ती उपचार घेत असताना आढळून आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांना याबाबत विचारणा केली असता तिने जुलाब होत असल्याचे सांगितल्याने तिला सलाईन लावल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी तिची चौकशी केली असता ती काहीच सांगत नसल्याने तिची पुन्हा पुन्हा चौकशी केली. मात्र ती काेणत्याच प्रश्नांना उत्तर न दिल्याने अखेरीस पोलिसांना कळविण्यात आले. तिचा उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित मुलीस पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 

कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवहार बंद

महिला कर्मचा-यांकडून चौकशी केली मात्र तरी तिने काही सांगितले नाही अखेरीस पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर ती घडाघडा बाेलू लागली. तिच्या गावातील गणेश असबे याने जबरदस्तीने तिच्यावर वेळावेळी शारिरिक संबंध ठेवल्याची फिर्याद आईने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेश असबे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्ह आष्टी (जि. बीड) येथे वर्ग करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT