Kamani Houd In Satara  esakal
सातारा

Satara Crime : साताऱ्यातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री गोळीबार; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

घटनास्‍थळी पोलिसांना दोन पुंगळ्या व दोन जिवंत राउंड सापडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

याबाबत विशाल अनिल वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सातारा : येथील कमानी हौद (Kamani Houd) परिसरात मध्यरात्री रात्री पाऊणेएकच्या सुमारास रस्त्यावर गाडी आडवी लावलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करत गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा. मंगळवार पेठ, गुरुवार पेठ) व अनोळखी चौघे असे सहाजणांवर शहर पोलिस (Satara Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या गोळीबारात कोणी गंभीर जखमी झाले नाही. घटनास्‍थळी पोलिसांना दोन पुंगळ्या व दोन जिवंत राउंड सापडले आहेत. दरम्यान, या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याबाबत विशाल अनिल वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याचा मित्र विक्रम यादव याच्यासोबत मध्यरात्री रात्री पावणेएकच्या सुमारास रस्त्याने निघाला होता. कमानी हौदासमोर जाधव पान शॉपजवळ तो आला. त्या वेळी तेथे हर्षद शेख याने दुचाकी रस्त्यावर आडवी लावली होती. यामुळे विशालला जाण्यास अडचण होत होती. त्यामुळे विशालने हर्षदला दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. गाडी बाजूला का घे म्हणाला, या कारणातून चिडून हर्षदने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तेथे दोघांमध्ये काही वेळ वाद झाला.

विशाल पुढे गेल्यावर चिडलेल्या हर्षदने धीरज ढाणे व अन्य साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी विशाल व विक्रम यांना दमदाटी व मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच विटाही फेकून मारल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा वाद सुरू असतानाच धीरज ढाणे याने त्‍याच्याकडील पिस्तूल काढल्याने विशाल घाबरला. बचावासाठी तेथून पळू लागला. मात्र, तोपर्यंत धीरज याने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने दोनवेळा फायर केले. सुदैवाने गोळी त्याला लागली नाही. फायरचा आवाज झाल्‍याने परिसरातील नागरिक दचकून बाहेर आले. त्यामुळे संशयितांनी तेथून पळ काढला.

दोन पुंगळ्या व दोन जिवंत राउंड आढळले

फायरिंग झाल्याचे समजल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी दोन पुंगळ्या व दोन जिवंत राउंड आढळून आले आहेत. परिसरात जमलेल्या नागरिकांकडून माहिती घेत पोलिसांनी विशालशी संपर्क साधला. त्यानंतर संशयितांची नावे निष्पन्न करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून दोघांची नावे समोर आली. त्यांच्यासह सहा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT