सातारा

सातारा जिल्ह्यातील 'या' गावात घरगुती गणेशाेत्सवच, मंडळांचा एकमुखी निर्णय

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. येथील सौभाग्य मंगल कार्यालयात नगरपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
 
या वेळी पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, नगरसेवक अनिल माळी, शहाजीराजे गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र कुंभार, दीपक बोडरे, सोमनाथ जाधव व विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रियजनाच्या दहनाची कुटुंबाला चिंता, जिल्हाधिकारी माणुसकी दाखविणार?

या वेळी अनिल गोडसे यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहरातील मंडळांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता यावर्षी साध्या पद्धतीने घरगुती गणेशोत्सव साजरा करावा, असे मत मांडले. त्यास प्रा. नागनाथ स्वामी, नगरसेवक माळी, आप्पासाहेब गोडसे, बनाजी पाटोळे तसेच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेत प्रशासनाकडून एक गाव, एक गणपती प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले जात आहे.

नववधू दोन लाखांसह पळाली, पुण्यासह साेलापूर जिल्ह्यातील आठ जणांना अटक

मात्र, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शहरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा न करता घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे श्री. महामुनी यांनी सांगितले. मुख्याधिकारी खांडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

संपादन - संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT