सातारा

पालकांनाे! शिक्षणाधिकारी म्हणतात, प्राथमिक शाळा सुरु करण्याचा आदेशच नाही

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत शासनाचे कोणतेही पत्र आलेले नाही. तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना शिक्षकांना अथवा शैक्षणिक संस्थांना केलेल्या नाहीत. परंतु केंद्र प्रमुखांच्या आढावा बैठकीत ऑनलाईन शिक्षण सुरळीत सुरु आहे का ? याची माहिती घेतली आहे. शाळा सुरु करण्याबाबत शासनानचे आदेश आले नाही अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी दिली. 

सातारा जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु झाले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यास परवानगी दिली जात आहे. त्यानूसार जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची उत्तम हजेरी आहे. दरम्यान इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप कोणताही निर्णय शासनाकडून प्राप्त झालेला नाही. 

अजित पवारांचा डाव; साता-यातील कार्यकर्ते चक्रव्यूहात!

तरी देखील काही शैक्षणिक संस्था पालक आणि विद्यार्थ्यांना संमती पत्र भरुन द्या असे सांगत आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी कोळेकर यांनी जिल्ह्यात अद्याप कोणत्याही शैक्षणिक संस्थेस पहिली ते आठवी शाळा सुरु करा असे आदेश दिलेले नाहीत अथवा शासनाकडून आम्हांला प्राप्त झालेले नाहीत असे स्पष्ट केले.

बाबा मी बरी झालीय, मला घरी यायचंय.. आराध्याची आर्त हाक आजोबांच्या मनाचा ठाव घेऊन गेली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

Nashik Crime: भोंदू खरातच्या ऑफिसबॉयला अटक, कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज लीक करत फोडलेलं बिंग

अवकाळी पाऊस नैसर्गिकच, केमिकल ट्रायलचा दावा निराधार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

SCROLL FOR NEXT