सातारा

शिरवडे (जि. सातारा) : ग्रामस्थ अंधारात, महावितरण समारंभात

अनिल घाडगे

शिरवडे (जि. सातारा) : शिरवडे स्टेशन, नडशी कॉलनी परिसरात शुक्रवारी तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे येथील विद्युत यंत्रणेचे डी.पी. जळाल्याने कोणेगाव येथे विजेचे खांब पडून विद्युत पुरवठा खंडित झाला. परंतु विद्युत पुरवठा खंडित असताना विद्युत मंडळाचे कर्मचारी वडोली रस्त्याला असणाऱ्या सबस्टेशनवर एका अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात रमल्याची चर्चा दिवसभर रंगली. 

चोवीस तास उलटून गेल्यानंतरही या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. तब्बल चोवीस तासांनंतर डिपी आणण्याची तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यासाठीची मदत देखील ग्रामस्थांनी केली.

मुंबई पालिकेनं सुरु केलेले संध्याकाळचे दवाखाने मार्च महिन्यापासून बंदच

या घटनेची सविस्तर माहिती अशी - शुक्रवारी दुपारनंतर कोपर्डे हवेली, नडशी, शिरवडे भागाला वादळी पावसाने झोडपले. विज गेल्याने स्थानिक ग्रामस्थआंनी वीज वितरण कर्मचाऱ्यांना संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. परंतु त्याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही. 

ऑक्टोबर हिट आणि सणासुदीच्या मोक्यावर वीज गायब झाल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबाबत महावितरणचे अधिकारी चेतन कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांची पाठराखण करत त्यांनी झालेला प्रकार सर्वसाधारण असल्याचे सांगितले. दरम्यान या भागातील विद्युत पूरवठा सुरळीत झाला असून ग्रामस्थांनी कर्मचा-यांना सहकार्य केल्यानेच सेवा सुरळीत हाेऊ शकली अन्यथा कर्मचा-यांच्या भरवशावर आणखी किती दिवस लागले असते ते न बाेललेच बरे असा सूर परिसरात विद्युत मंडळाबद्दल उमटला आहे.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

Edited By : Siddharth Latkar


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT