सातारा

सातारा भाजी मंडईतून चालाय, मग जरा जपूनच!

किरण गाडे

सातारा : येथील पोवई नाका ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी मंडई भरत असून, त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो आहे. परिणामी, कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूस भाजीविक्रेते बसत असतात. पूर्ण रस्ता हा विक्रेते व खरेदीदार हे व्यापून टाकत आहेत. काही विक्रेते व ग्राहक स्वतःच्या दुचाकी तेथेच पार्क करत आहेत. बस स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना तर जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. असे
असतानादेखील विक्रेते व ग्राहक यांच्यात स्वतःची काळजी हा विषयच राहिलेला दिसत नाही. सर्व भाजीविक्रेते अगदी जवळजवळ बसून किंवा उभे राहून भाजी विकत असतात. 

त्याचबरोबर भाजी खरेदीसाठी येणारे ग्राहकसुद्धा एकमेकांना खेटून भाजी खरेदी करताना दिसत आहेत. कोणी ग्राहक येथे सार्वजनिक जागी थुंकतही असतात. बहुतांश ग्राहक व विक्रेते हे मास्कसुध्दा लावत नाहीत. याच पद्धतीने हे सर्व चालत राहिल्यास कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून भाजीविक्रेत्यांना योग्य ती नियमावली तयार करूनच भाजी विकण्यास परवानगी द्यावी, अन्यथा कोरोना रुग्णांचा विस्फोट होण्यास वेळ लागणार नाही.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT