food sakal
सातारा

मुलांसाठी आता न्युट्रिटिव्ह स्लाईस; शालेय पोषण आहारांतर्गत वाटप

तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीनचा समावेश

महेश बारटक्के

कुडाळ : शाळेतही मुलांचा पोषण चांगले व्हावे, यासाठी शालेय पोषण आहाराच्या नावीन्यपूर्ण उपक्रम योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता न्युट्रिटिव्ह स्लाईस पोषक आहार देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीनचे मुख्य घटक असलेला पोषक आहार विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस वाटप होणार असून, शाळांना त्याचा पुरवठा सुरू आहे.

विद्यार्थ्यांना तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीनसह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठी साखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रिटिव्ह स्लाईस बनविण्यात आली असून, आकर्षक पद्धतीने सील बंद पाकिटातून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जात आहे. आकर्षक अशा पॅकिंगमध्ये बिस्किटच्या पुड्याप्रमाणे दिसणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबीन अशा वेगवेगळ्या पॅकेट्समधून हा पोषण आहार शाळांना पुरवला आहे. पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी सहा पुडे, तर सहावी ते आठवीसाठी नऊ पुडे आहेत.

प्रत्येक पुड्याचे वजन १२० ग्रॅम असून, २४ दिवसांकरिता या पाचही न्युट्रिटिव्ह स्लाईसचे वाटप होणार आहे. आठवड्यातील पाच दिवसांत पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रतिदिन ३० ग्रॅम, ७.५ ग्रॅम वजनाची चार बिस्किटे, तर सहावी ते आठवीच्या मुलांना ४५ ग्रॅम, ७.५ ग्रॅम वजनाची सहा बिस्किटे दिली जाणार आहेत. राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जालन्यातील दिव्या एस. आर. जे. फूड्स एलएपी कंपनीकडून हा पोषण आहार पुरविण्यात येत आहे. पोषण आहारातील या नवीन बदलांमुळे मुलांना न्युट्रिटिव्ह स्लाईसमधून वैशिष्ट्यपूर्ण पौष्टिक आहार मिळणार आहे. शासनाच्या या अभिनव योजनेतून निश्चितच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना योग्य पोषणमूल्ययुक्त समतोल आहाराचा आरोग्यवृद्धीसाठी फायदा होणार आहे.

शालेय पोषण आहार अंतर्गत हा पूरक आहार दिला जात आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही म्हणून त्याच्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आहारात प्राधान्याने घटक द्यावे लागतात. ते फळांच्या, भाजीपाल्यांच्या माध्यमातून द्यावे लागतात. ते या न्युट्रिटिव्ह स्लाईसमधून मिळणार आहेत. यातून त्यांची प्रकृती चांगली राहण्यास मदत होईल.

- चंद्रकांत कर्णे, शिक्षण विस्तार अधिकारी, जावळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT