सातारा

भुईंज : अजून किती महिने रावसाहेब करणार अंधारात काम?

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : वाई तालुका भूमिअभिलेख कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या येथील कार्यालयात आठवड्यातून दोन दिवस कामकाज होत असल्याने नागरिकांची कामे वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कार्यालयातील मोजणीसह अनेक प्रकारची शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागत असून, त्यात वेळ, पैसा वाया जात असल्यामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयातील वीज कित्येक महिने बंद असल्याने अंधारात चाचपडत कामकाज सुरू आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीसह गावठिकाणची विविध शासकीय कामे करून घेण्यासाठी स्थानिक भूमिअभिलेख कार्यालयाशी संबंध येतो. वाईनंतर पूर्व भागातील गावांची संख्या जास्त असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी येथे भूमिअभिलेख कार्यालय कार्यान्वित केले आहे. परंतु, या कार्यालयातील कामाची व्याप्ती मोठी असतानाही ते आठवड्यातून फक्त दोन दिवसच उघडत असल्याने नागरिकांच्या कामाची पूर्तता होत नाही. नागरिकांना वारस नोंदी, मिळकतीच्या नकला व इतर कामे करून घेण्यासाठी वारंवार या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे काम अपेक्षित वेळेत व संशोधनपूर्वक करून देणे आवश्‍यक आहे. तथापि या कार्यालयात नागरिकांचे काम अगदी गेल्याबरोबर होईल, याची शाश्वती मुळीच नाही.

उदयसिंह उंडाळकरांच्या रुपाने कॉंग्रेसचे सिमोल्लंघन?
 

नागरिकांना आपले काम करून घेताना अनेक अडचणी येतात. अनेक नागरिकांना आपली इतर कामे सोडून प्रसंगी रजा काढून कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी वारंवार या कार्यालयात जावे लागते. या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात लागणारी कागदपत्रे एकाच वेळी आणायला सांगतील, असे कधी होत नाही. एक आणल्यानंतर दुसऱ्या कागदाला दुसरा हेलपाटा असतोच. हे सर्व झाले तर कार्यालयात पुन्हा कर्मचारी उपलब्ध असेल व कामाची वेळेत पूर्तता होईल, असे कधीच घडत नाही. त्यातच या कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, कार्यालयात काम करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा तर अनेक दिवसांपासून गायबच आहे. कार्यालय सुरू झाल्यापासून वीजपुरवठा झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अंधुक प्रकाशात चाचपडत काम करावे लागत आहे. या सर्व बाबींना तोंड देत नागरिक आपले काम करून घेताना हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे 

भुईंज कार्यालयातील अडचणींतून नागरिकांची सुटका व्हावी व कामाचे सोपस्कार सुलभरित्या पार पडावे, यासाठी उपसंचालक भूमिअभिलेख कार्यालय, अधीक्षक सातारा, आमदार मकरंद पाटील यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

जिवलग मैत्रिणींची चटका लावणारी एक्‍झिट

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT