सातारा

'या' गावात कोमट पाणी पिणे बंधनकारक; ग्रामपंचायतीचा ठराव

अनिल बाबर

तांबवे (जि. सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून येथील दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी सात ते दुपारी एक या वेळेतच सुरू ठेवावी. त्याचबरोबर गावातील धाप लागलेल्या रुग्णांना बेड मिळेपर्यंत गावातच ऑक्‍सिजनची सोय व्हावी, यासाठी ऑक्‍सिजन यंत्रे लोकवर्गणीतून विकत घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत सर्वांनी वाफारा घेणे, कोमट पाणी पिणे बंधनकारक करण्यात आले. 

येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्रीचे संचालक रामचंद्र पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच रवींद्र ताटे, शंकर पाटील, सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, पोलिस पाटील पवन गुरव, जयंत पवार, राजेंद्र कुत्ते, रवींद्र कुत्ते, नितीन पवार, सुनील पाटील यांच्यासह किराणा व अन्य दुकानदार उपस्थित होते. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करायच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ऑक्‍सिजन यंत्रासाठी लोकवर्गणी काढून तातडीने गावातच ऑक्‍सिजन यंत्र उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करावी. 

त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि गावातील गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. 15 सप्टेंबरपर्यंत सर्वांनी वाफारा घेणे, कोमट पाणी पिणे हे बंधनकारक करावे. लहान मुले, वयस्करांना अनावश्‍यक बाहेर फिरू देऊ नये. विक्रेत्यांना गावात येण्यास मज्जाव करावा. मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून बसणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारावा आदी महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आले. दरम्यान, मेडिकल आणि दवाखाने सुरू ठेवण्यासाठी सर्वानुमते मुभा देण्यात आली. त्यामुळे गावातील रुग्णांची चांगली सोयही होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT