सातारा

जिल्ह्यातील शाळांत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ; सुरक्षिततेचे नियम पाळल्याचा परिणाम

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील 713 शाळा सुरू होऊन 28 हजार 699 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम व अटींचे पालन केल्याने सद्य:स्थितीत 737 शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांच्याही संख्येत वाढ होऊन ती 33 हजार 812 एवढी झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शक सूचना फलक, वर्गखोल्या व विविध विभागांचे सॅनिटायझेशन, स्वच्छता केली होती. सुरवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक दिसत होती. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती 19 टक्के होती. सध्या 22 टक्के झाली आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिन, सॅनिटायझर, मास्क घालूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, वर्गांमध्ये एक बेंच सोडून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केल्याने विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 80 शिक्षक बाधित आढळले असून, शिक्षकेतर कर्मचारी 34 आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे असलेले 46 शिक्षक आढळले आहेत.

पाटण तालुक्‍यात सर्वाधिक उपस्थिती 

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्याने विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती व 100 टक्के शाळा पाटण तालुक्‍यात सुरू झालेल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT