सातारा

आनेवाडी टोलनाक्‍यावर अधिकाऱ्यास अपमानास्पद वागणूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : मंत्रालयात कार्यरत असलेले अतिरिक्त सचिव संतोष पराडकर हे कोल्हापूरहून मुंबईला निघाले असताना शनिवारी रात्री 12.20 च्या सुमारास आनेवाडी टोल नाका येथे फास्ट टॅग गाडीला असूनही टोलवरील फास्ट टॅग न चालल्याने दमदाटी करत कर्मचाऱ्याने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. याबाबत त्या अधिकाऱ्याने रीतसर रस्ते प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. 

आनेवाडी टोल नाक्‍यावर सतत वादावादी होत असते. शनिवारी सुटी घेऊन ड्युटीवर निघालेले अधिकारी पराडकर हे लेन क्रमांक आठमधून जात होते. गाडीला फास्ट टॅग होता; परंतु टोल व्यवस्थापनकडील मशिन ऍक्‍सेप्ट करत नसल्याने तेथील कर्मचारी हुज्जत घालू लागले. पराडकर यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवले तरी दमदाटी केली. 

त्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले होते. पराडकर यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे यांनी आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यावर सामान्य व वाहनचालकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचीही तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कार्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य! GNCTD आणि MCD मध्ये मोठा बदल; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Tahsildar Rakesh Gidde Death : कष्टाने ‘तहसिलदार’ झाला पण, अर्ध्यावर डाव मोडला! राकेश गिड्डे यांच्या निधनाने सांगलीकर भावूक

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

Baramati News: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे का घेतला? हर्षवर्धन सपकाळांनी खरं कारण सांगितलं; आतली बातमी आली समोर

SCROLL FOR NEXT