कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या. परिणामी, तालुक्यातील एकूण 30 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. पंचायत समितीचे शिक्षण, आरोग्य, कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविली आहे. परंतु, हा अतिरिक्त कामाचा भार वाहताना त्यांना कसरत करावी लागत आहे.
सकाळी गावात आणि दुपारी कार्यालयात अशी प्रशासकाची अवस्था झाली आहे. त्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कामाचा ताणही वाढला आहे. जून ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे शासनाने आदेश काढले. योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याची संधी पालकमंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे गावगाड्यातील अनेकांनी गुडघ्यास बाशिंग बांधली होती. पण, योग्य व्यक्तीच्या निवडीचे कोणतेही निकष नसल्याने हा विषय न्यायालयात गेला. शिक्षण, आरोग्य, कृषी विभागाच्या सात अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची जबादारी सोपवण्यात आली.
माण तालुक्यातील 30 ग्रामपंचातींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर सात अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येकाकडे एक ग्रामपंचायत आहे. उर्वरित अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांकडे चार-पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत कोरोनाचा कहर कमी होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत प्रशासक म्हणून जबादारी पार पाडावी लागणार आहे.
प्रशासक व नियुक्ती असलेल्या ग्रामपंचायती
पी. बी. सातपुते - श्रीपालवण, कुळकजाई, शिंदी बुद्रुक, गोंदवले खुर्द, धामणी. व्ही. पी. कुलकर्णी - हवालदारवाडी, काळचौंडी, संभूखेड, गंगोती. बी. बी. भोसले- मार्डी, वरचे म्हसवड, राजवडी, येळेवाडी. एम. एस. अडागळे - पळसावडे, पुकळेवाडी, कुकुडवाड, खडकी. एम. के. चितरळकर - टाकेवाडी, थदाळे, गटेवाडी, जांभूळणी. जी. एल. दडस- भांडवली, मोही, राणंद, ढाकणी. संगीता गायकवाड - पर्यंती, पानवण, वळई, हिंगणी, सोकासन अशा आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.