सातारा

ओगलेवाडीला हवाय पोलिस ठाण्याचा 'दर्जा'; गृहखात्याकडून मान्यता अपेक्षित!

मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : परिसरातील विस्तारीकरण व गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने येथील पोलिस औट पोस्टला पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी आहे. पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षे प्रलंबित आहे. सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्राचे नवीन पोलिस ठाणे करण्याच्या मागणीला गृहखात्याने मान्यता दिली आहे. त्यात येथील पोलिस दूरक्षेत्राचा समावेश नसल्याने परिसरातील लोकांची नाराजी आहे. 

ब्रिटिशकाळामध्ये कऱ्हाड रेल्वे स्थानकाजवळ पूर्वी अनेक वर्षे येथील औट पोस्ट होते. ते गावाच्या बाहेर असल्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. लोकांच्या मागणीवरून नंतर 1999 च्या सुमारास ते गावाच्या मध्यभागी खासगी जागेत भाड्याने कार्यरत आहे. पोलिस दूरक्षेत्राच्या या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. वीज, पाणी, स्वच्छतागृहांची गैरसोय आहे. पोलिस ठाण्यासमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्यवसायांचेसुद्धा अतिक्रमण आहे. पोलिसांना राहण्याच्या खोल्या नाहीत.

औट पोस्टच्या कार्यक्षेत्रात हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची, राजमाची, गजानन सोसायटी, विरवडे, बनवडी अशी सात गावे असून, लोकसंख्या 40 हजारांवर आहे. त्यामानाने कर्मचारी वर्ग अपुरा आहे. फौजदार एक, हवालदार दोन, कॉन्स्टेबल तीन अशी अपुरी संख्या आहे. या परिसरात रेल्वे स्थानक, महाविद्यालय, वीज वितरण कार्यालय, औद्योगिक वसाहत, टेंभू प्रकल्प कार्यालय, बाजारपेठ, सदाशिवगड जानाईदेवी मंदिर तसेच गावालगत सुर्ली व शामगाव घाट असल्याने लोकांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी असते. पोलिसांचा कामाचा व्याप व ताण पाहता नव्या स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे. 

गावाजवळ 40 एकरांत सुमारे 550 कोटी रुपयांचे जागतिक पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व विद्यापीठ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने सध्याच्या पोलिस औट पोस्टचे स्वतंत्र पोलिस ठाणे करणे गरजेचे व अत्यंत आवश्‍यक आहे. 
-प्रशांत यादव, अध्यक्ष, कऱ्हाड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT