One crore quintals of sugar production satara esakal
सातारा

एक कोटी क्विंटलची साखरनिर्मितीत उड्डाणे

जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरूच

- विकास जाधव

काशीळ : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू आहे. सर्व कारखान्यांनी आतापर्यंत ९४ लाख ६७ हजार ३८६ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून एक कोटी २० लाख ५ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी १०.७८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्याची साखरनिर्मितीत एक कोटी क्विंटलवर साखरनिर्मिती टप्पा पार केला आहे. अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने मे महिन्यापर्यंत ऊस गाळप हंगाम सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील सहा सहकारी व सात खासगी कारखान्यांकडून गाळप केले जात आहे. या गाळपात ‘जंरडेश्वर’ या कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक १५ लाख ५९ हजार २४० टन उसाचे गाळप केले असून, १७ लाख १९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ‘सह्याद्री’ने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याने १२.५९ टक्के, तर सर्वांत कमी साखर उतारा ‘श्री दत्त इंडिया’चा ९.०३ टक्के आहे.

जिल्ह्यात एकूण गाळपापैकी सहा सहकारी कारखान्यांनी ३९ लाख ४३ हजार ५ टन ऊस गाळप करून ४६ लाख २० हजार ६१० क्‍विंटल साखरनिर्मिती केली आहे. सात खासगी कारखान्यांनी ५५ लाख २४ हजार ३८१ टन ऊस गाळपाद्वारे ५५ लाख ८५ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. शिल्लक उसाच्या क्षेत्राचा विचार करता कारखान्यांचा मे महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज आहे. या हंगामात साखरनिर्मितीत एक कोटी क्विंटलचा टप्पा पार केला आहे. सर्व ऊस गाळप झाल्याशिवाय गाळप बंद न करण्याचा सूचना देण्यात आल्यामुळे या हंगामात सर्वाधिक साखरनिर्मिती होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

तोडणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक फटका

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने, तसेच पाण्याची टंचाई भासू लागल्याने लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी साखर कारखाने, तसेच चिटबॉयकडे शेतकऱ्यांकडून चकरा घातल्या जात आहेत. या शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा ऊसतोड मजुरांकडून घेतला जात आहे. या ऊसतोड मजुरांकडून एकरी चार ते पाच हजार रुपयांची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT