सातारा

पुणे बंगळूर महामार्गावरील त्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे : पुणे- बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) येथे आज (शुक्रवार) सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यात भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीने (क्रमांक एमएच 11 डब्लू 302) पुढे चाललेल्या तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की त्यातील एक दुचाकीस्वार
महामार्गावरील पूलावरुन थेट सुमारे 25 फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला. अपघातात अन्य दुचाकीवरील प्रवासीही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर माेटार चालकाने वाहन जागेवर सोडून पलायन केले. या अपघातात तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातात महामार्गावरुन सेवा रस्त्यावर कोसळलेले राजेंद्र हणमंत घाडगे (वय 45, रा. समर्थगाव, ता. सातारा) यांचा सातारामधील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घाडगे हे जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. अमर शिवाजी पानस्कर (वय 32, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व कुमार माणिक पोतदार (वय 36, रा. सासपडे, ता. सातारा) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. 'जनता क्रेन'चे अब्दुल सुतार, अजीम सुतार, सुहेल सुतार यांनी बोरगाव पोलिसांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT