Satara District Court esakal
सातारा

लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी पत्नीला दिलं पेटवून; पतीला जन्मठेपेची शिक्षा

प्रवीण जाधव

घरगुती कारणातून चिडून राजू शिंदेने पत्नीला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.

सातारा : लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी पत्नीला पेटवून तिचा खून केल्याप्रकरणी एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजेश ऊर्फ राजू गणपत शिंदे (वय ३०, रा.खांबील पोकळे, ता. महाबळेश्वर) असे त्याचे नाव आहे.

सुनीता राजू शिंदे (वय २८) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजू शिंदे व सुनीता शिंदे यांचा विवाह झाल्यानंतर राजू पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत होता. यातूनच शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणही करत होता. घरगुती कारणातून चिडून राजू शिंदे याने ९ जानेवारी २०१७ रोजी पत्नीला दुपारी चारला अंगावर रॉकेल ओतून सुनीताला पेटवून दिले. जखमी झालेल्या सुनीताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

मेढा पोलिस ठाण्यात (Medha Police Station) पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आशीर्वाद कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शास्त्रोक्त व भौतिक पुरावा या खटल्यात महत्त्‍वपूर्ण ठरला. न्यायाधीशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सातारा जिल्हा न्यायालयातील (Satara District Court) प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पोलिसांनी या वेळी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT