Eicher Tempo
Eicher Tempo esakal
सातारा

फलटण-दहिवडी मार्गावर टेम्पोच्या धडकेत कोळकीचा एक ठार

सकाळ डिजिटल टीम

चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, हयगयीने गाडी चालवून आबा खरात यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

फलटण शहर (सातारा) : कोळकी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण-दहिवडी रस्त्यावर (Phaltan-Dahiwadi road) एका ढाब्याजवळ सहा चाकी आयशर टेम्पोने, मॉर्निंग वॉक करत असणाऱ्या वृद्धाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात वृद्ध ठार झाला असून आयशर टेम्पो (Eicher Tempo) चालक फरार झाला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून (Phaltan Rural Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास कोळकी गावच्या हद्दीत संदीप ढाब्याजवळ दहिवडी बाजूकडून फलटण बाजूकडे आबा दशरथ खरात (वय 63) मूळ रा. कलेढोण, ता. खटाव सध्या रा. नक्षत्र अपार्टमेंट, कोळकी (ता. फलटण) हे रस्त्याच्या पश्चिम किनारपट्टीने वॉकिंग करत होते. त्यावेळी दहिवडीवरून फलटण दिशेला येणाऱ्या लाल रंगाच्या आयशर सहाचाकी गाडी क्र. MH.23.AU.7700 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, हयगयीने, अविचाराने चालवून रस्त्याच्या पश्चिम किनारपट्टी चालणाऱ्या आबा खरात यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात आबा खरात हे गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारास दवाखान्यात न नेता अथवा अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता, आयशर टेम्पो चालक पळून गेला. तर आबा खरात हे लाइफलाइन हॉस्पिटल फलटण येथे उपचार घेत असताना 7.30 वाजणाच्या सुमारास मयत झाले असल्याची फिर्याद सूरज आबा खरात यांनी दिलीय. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT