Malkapur esakal
सातारा

भांडणाचा राग मनात धरून एकावर धारदार शस्त्रानं वार

राजेंद्र ननावरे

लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार केला आहे.

मलकापूर : लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. आज सकाळी अकराच्या सुमारास येथील मलकापूर (Malkapur) फाट्यावर घटना घडलीय. भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या घटनेनं वातावरणात तणाव होता.

विश्वास येडगे (वय 29, रा. मलकापूर) असे जखमीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी येडगे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने येडगे यांच्या पोटावर व शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात विश्वास हा मलकापूर फाटा येथे भररस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी जखमी विश्वासला उपचारासाठी त्वरित कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital Karad) हलवलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस (Karad City Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT