सातारा

मूकबधिर वृद्ध महिलेवर युवकाकडून अत्याचार, आरोपी जेरबंद

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : परिसरातील एका गावात मूकबधिर वृद्ध महिलेवर युवकाने अत्याचार केला. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संशयितास अटक केली आहे. सूरज दत्तात्रय पवार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 4) दुपारी ही घटना घडली. पीडित वृद्धा ही मूकबधिर आहे. आई व भावाबरोबर त्या राहतात. घरातील पडवीत झोपलेल्या असताना सूरजने तेथे येऊन त्यांच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर वृद्धेने खुणेद्वारे ही माहिती कुटुंबीयांना दिली. त्याच दरम्यान शेजारील महिलाही मदतीसाठी धावत आल्या. हे पाहून सूरजने घरातून पलायन केले. काल या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांनी मूकबधिर व्यक्तींची भाषा जाणणाऱ्या एका शिक्षिकेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. घटनेचा उलगडा होताच तत्काळ हालचाली करून संशयित युवकास अटक केली. याचा तपास पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT