satara 
सातारा

‘एक गाव, एक गणपती’साठी प्रयत्न; पोलिसांकडून गावोगावी बैठकांचे सत्र

सध्या कोरोना रुग्णाचे आकडे घटत असलेतरी धोका कायम आहे

- विकास जाधव

काशीळ (सातारा) : कोरोनाचा (corona) संसर्ग कमी झाला असला, तरी धोका कायम असल्याने गणेशोत्सवात वाढ होऊ नये, यासाठी बोरगाव पोलिस ठाण्याकडून ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी गावोगावी गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृत्ती केला जात आहे.

सध्या कोरोना रुग्णाचे आकडे घटत असलेतरी धोका कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात ‘एक गाव, एक गणपती’ योजनेतून सार्वजनिक उत्सवासंबंधी सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी गावोगावी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन हा उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या पदाधिऱ्यांचा रोपे देऊन सत्कारही केला जात आहे.

नागठाणे, अतीत, काशीळ, कोपर्डे आदी गावांत बैठका झाल्या असून, या उपक्रमास मंडळाच्या प्रतिनिधींचाही प्रतिसाद मिळत आहे. काशीळला झालेल्या बैठकीस डॅा. वाघ, सरपंच सुभाषराव जाधव, जयवंत कुंभार, सुरेश माने, भरत माने, विश्वासराव जाधव, महेंद्र कांबळे, बीट अंमलदार बाबा महाडिक, विजय साळुंखे, पोलिस पाटील अजित कांबळे, धनंजय तळेकर, श्रीजीत नायर, ग्रामसेवक रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. उत्सव काळात संसर्ग टाळण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उत्सवाचे नियोजन करण्यासाठी बैठका घेण्यावर भर दिला आहे. या बैठकांना गणेश उत्सव मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती डॉ. सागर वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT