कोयना धरण
कोयना धरण sakal
सातारा

कोयना धरणात ठणठणाट

विजय लाड

कोयनानगर - मॉन्सून लांबल्याने कोयना धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यावर पश्चिमेकडील वीजप्रकल्प, तर पूर्वेकडील शेती सिंचन चालू आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला असूनही शेती सिंचनासाठी साठा आरक्षित असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातून कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी धरणातून अत्यल्प पाणीसाठा वापरला जात आहे. कोयना धरणात केवळ १० जुलैपर्यंत उपलब्ध असणारा पाणीसाठा पुरणार आहे.

कोयनची १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. धरणात १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध अत्यल्प पाणीसाठ्यावर पूर्वेकडील सिंचन, तर पश्चिमेकडील वीजप्रकल्प कार्यान्वित आहेत. पूर्वेकडील शेती सिंचनासाठी धरणातून दोन हजार १०० क्युसेक, तर पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला दररोज ०.२ टीएमसी पाणीसाठा सोडला आहे. धरणातील पाणीसाठा ओहोटीकडे आहे. त्यामुळे पाण्याचा खडखडाट जाणवत आहे.

धरणातील उर्वरित पाणीसाठा शेती सिंचनासाठी आरक्षित असल्याने वीजनिर्मितीवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी पाण्याचा वापर कमी झाला आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पातून कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. एक जूनच्या नवीन जल वर्षापासून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी २.८ टीएमसी पाण्याचा वापर महानिर्मिती कंपनीने केला आहे, तर पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी २.४४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. ०.५१ टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी कमी वापरण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा १० जुलैपर्यंत पुरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT