satara market committee sakal
सातारा

Satara : बाजार समिती सभापतिपदी प्रकाश पाटलांना संधी; संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मोठी उत्पन्न असणारी येथील बाजार समिती आहे. या बाजार समितीत गूळ, सोयाबीन, शेंगासह व अन्य शेतमालांची मोठी आवक होऊन आर्थिक उलाढालही मोठी होते.

शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना शह देण्यासाठी माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात पॅनेल टाकले होते.

बाजार समितीच्या निवडणुकीत अॅड. उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर साथ दिली. त्याचबरोबर कऱ्हाड उत्तरमधील आमदार पाटील यांचे विरोधक असलेले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनीही अॅड. पाटील उंडाळकर यांच्या पॅनेलला साथ दिली.

त्यामुळे त्यांच्या पॅनेलचा विजय सुखकर झाला. बाजार समिती निवडणुकीत अॅड. उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले. या निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतलेले अॅड. उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापतिपद देण्यात आले, तर उपसभापतिपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली होती.

सभापती कदम यांनी सर्वांना संधी मिळावी या ठरलेल्या धोरणाप्रमाणे राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा उपनिबंधक यांनी मंजूर केल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यवाही सुरू झाली होती. त्यानुसार आज उपनिबंधक यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली त्या बैठकीत सभापतीपदी प्रकाश पाटील यांना सर्वांना मते संधी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे.

दैनिक सकाळचे वृत्त ठरले खरे

नवीन सभापती निवडीसाठी सहकार विभागाकडूनाही आज निवड निश्‍चित करण्यात आली होती. सभापतिपद कोणाला मिळणार, याबाबत संचालकांपैकी अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे मानले जाते.

त्यामुळे चुरस वाढली होती. रयत संघटनेचे प्रमुख अॅड. उंडाळकर व माजी मुख्यमंत्री, आमदार चव्हाण हे कोणाला संधी देणार? याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, यावेळी सभापती म्हणून संचालक प्रकाश पाटील-सुपनेकर यांनी संधी मिळेल अक्षवृत्त दैनिक सकाळने प्रसिद्ध केले होते. आज सभापती पदी प्रकाश पाटील यांची निवड झाल्याने दैनिक सकाळचे वृत्त तंतोतंत खरे ठरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT