सातारा

बानुगडे-पाटलांना विधान परिषदेवर संधी?; साताऱ्यात सेनेला मिळणार तिसरा आमदार!

उमेश बांबरे

सातारा : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाणाऱ्या 12 नेत्यांची नावे राज्य मंत्रिमंडळाने मंजूर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद लिफाफ्यातून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे दिली आहेत. त्यामध्ये शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर व साताऱ्याचे शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे साताऱ्याला शिवसेनेच्या माध्यमातून आणखी एक आमदार मिळण्याची शक्‍यता आहे. 

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमायच्या नावांचे गुपित अद्याप कायम आहे. राज्यमंत्री मंडळाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील 12 नावांची यादी नुकतीच राज्यपालांकडे दिली आहे. यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, की सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिफारस केलेली नावे राज्यपालांकडे दिली आहेत. ही नावे राज्यपाल मंजूर करतील.'' या 12 नावांमध्ये शिवसेनेतून उर्मिला मातोंडकर, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा समावेश असून, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे. कॉंग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझ्झपर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. त्याशिवाय विजय कारंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांची नावेही यामध्ये असू शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

शिवसेनेकडून प्रा. बानुगडे-पाटील यांच्या नावाची शिफारस केली असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला तिसरा आमदार मिळणार आहे. प्रा. बानुगडे-पाटील यांनी यापूर्वी सातारा व सांगलीचे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT