Free vaccination esakal
सातारा

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची 'शो बाजी'

प्रशांत घाडगे

शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी कोरोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत.

सातारा : कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू असताना सातारा नगरपालिकेने (Satara Municipality) सातारकरांसाठी एक आयसोलेशन सेंटर सुरू केले नाही. आता कोरोना रुग्ण कमी होत असताना आणि लस सर्वत्र उपलब्ध असताना सत्ताधाऱ्यांनी शहरात ‘मोफत लसीकरण’ (Free vaccination) अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. एकीकडे डेंगीचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची ‘शो बाजी’ सुरू आहे. त्यामुळे हा बैल गेला अन् झोपा केला, कारभार कधी सुधारणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने (Opposition Leader Ashok Mone) यांनी केला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. मोने म्हणाले, ‘‘सातारा शहरात कोरोनाचे कहर सुरू होता. त्या वेळी सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. लस मिळत नसल्याने अनेकांनी स्व खर्चाने लस घेतली. पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडर यातच सत्ताधारी गुरफटले होते. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शहरात लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत. मात्र, त्यातही सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी सुरू केली आहे.

शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी कोरोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सातारकरांना नेहमीच बसला आहे आणि आताही बसत आहे. लसीकरण कॅम्प आणि तुमची बॅनरबाजी सुरू राहू द्या; पण डेंगीपासून सातारकरांना वाचवण्यासाठी काही तरी उपाययोजना करा, असाही सल्ला मोने यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT