Madhavi Kadam esakal
सातारा

कळसूत्री बाहुली म्हणून नगराध्यक्षांना खुर्चीवर बसवलंय

प्रशांत घाडगे

सातारकरांना भूलथापा मारून आणि फसवून पालिकेची सत्ता काबीज केलेल्यांनी गेल्या पाच वर्षांत पालिका अक्षरशः धुवून काढली.

सातारा : सर्वसामान्य कुटुंबातील महिला असल्याचा गाजावाजा करून सातारकरांना भुलवून एका सामान्य महिलेला नगराध्यक्ष केले. परंतु, त्यांना केवळ कळसूत्री बाहुली म्हणून खुर्चीवर बसविण्यात आले. निवडणूक जवळ आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांचे नारळ फोडले. मात्र, या कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्षा माधवी कदम (Mayor Madhavi Kadam) कुठेही दिसत नसून त्या हरवल्या आहेत का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे, असा उपरोधिक टोला सातारा पालिकेचे (Satara Municipality) विरोधी पक्षनेते अशोक मोने (Opposition Leader Ashok Mone) यांनी लगावला आहे.

ते म्हणाले, ‘‘सातारकरांना भूलथापा मारून आणि फसवून पालिकेची सत्ता काबीज केलेल्यांनी गेल्या पाच वर्षांत पालिका अक्षरशः धुवून काढली. टक्केवारी आणि टेंडरसाठी एकमेकांचे गळे धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षांत सातारकरांसाठी काहीही केले नाही. नगराध्यक्षा तर केवळ नामधारी बनून राहिल्या. त्यांनी काही करायचं म्हटलं तरी त्यांच्यातलाच दुसरा गट त्यांचे हात बांधून टाकायचा. काही दिवसांपासून तर नगराध्यक्षा गायब असल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत शहरात अनेक ठिकाणी नारळ फुटले. विकासकामे, रस्ते आणि चौकांच्या नावाचे नारळ फुटले हे सातारकरांना काही समजले नाही. अशा या अनोख्या आणि महत्त्‍वाच्या कार्यक्रमांतही नगराध्यक्षा उपस्थित नसल्याचे आश्चर्य आहे.’’

दरम्यान, माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांच्यासारखे कदम यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले की काय? अशी शंकाही निर्माण झाली आहे. कार्यकाल संपत आल्याने गेले पाच वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला वैतागलेल्या नगराध्यक्षांनी पळ तर काढला नाही ना? सर्वसामान्य घरातील महिला नगराध्यक्ष सातारा पालिकेला मिळाली आहे, हे दाखवण्यासाठी तरी त्या पालिकेत हजर पाहिजेत. त्यामुळे गायब झालेल्या नगराध्यक्षा कदम यांचा शोध घेणाऱ्याला आपण संपूर्ण पोशाख करू, असा टोला मोने यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT