Dengue And Chikungunya Patients
Dengue And Chikungunya Patients esakal
सातारा

नागरिकांनो, सावधान! साताऱ्यात कोरोना पाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्ह्यात ऐन कोरोनाच्या महामारीत गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. मागील सहा महिन्यांत डेंगीचे २५ व चिकुनगुनियाचे ३३ रुग्ण (Dengue And Chikungunya Patients) आढळले आहेत. त्यामुळे, डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करत साथीच्या आजारांना आळा घालण्याची गरज आहे. (Outbreaks Of Dengue And Chikungunya Have Increased In Satara District Satara Health News)

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने डेंगीच्‍या प्रादुर्भावाने थैमान घातले होते.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने डेंगीच्‍या प्रादुर्भावाने थैमान घातले होते. त्यानंतर हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या (Satara Health Department) वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला होता. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केल्याने डेंगीच्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला आहे. तसेच, ज्या ठिकाणी रुग्ण आढळले, त्या परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम राबवित उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, सद्य:स्थितीत पावसाच्या तोंडावर जिल्ह्यासह सातारा शहरात डेंगी व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. यामध्ये, मे महिन्यात उंब्रज, कोडोली व धनगरवाडी या गावांच्या परिसरात डेंगी व चिकुनगुनियाचे रुग्ण जास्त आढळले आहेत. जिल्ह्यात डेंगीचे जानेवारी महिन्यात सात, एप्रिलमध्ये दहा, मे महिन्यात एक तर जून महिन्यात सात रुग्ण आढळले. तसेच चिकुनगुनियाचे जानेवारीत २३, फेब्रुवारीमध्ये तीन, मार्चमध्ये एक तर एप्रिल महिन्यात सहा रुग्ण आढळले आहेत.

Dengue

दरम्यान, पावसाच्या (Heavy Rain) दिवसांत साथीच्‍या आजारांचे प्रमाण वाढते. या आजारांना रोखण्यासाठी डेंगीचे डास (Dengue Mosquitoes) स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्याने घरातील पिण्याची भांडी नियमित स्वच्छ करा. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवा. शिवाय घराच्या छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साचून ठेवू देऊ नका, पाणी साठविण्यात आलेली भांडी योग्य पध्दतीने झाकून ठेवणे, साचलेली डबकी वाहती करणे, खिडक्‍यांना जाळ्या बसविणे, सर्व पाणीसाठ्यांना घट्ट झाकण बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, परिसरातील खराब टायर, फुटके प्लॅस्टिक कॅन, डबे नष्ट करावेत आदी उपाययोजना करावी, अशा सूचना आरोग्य विभागाच्या हिवताप कार्यालयाने नागरिकांना केल्या.

Doctor

डेंगीची लक्षणे :

  • तीव्र ताप येणे व डोके दुखणे

  • सांधे व अंगदुखी

  • डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे

  • रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे

  • अंगावर लालसर पुरळ येणे

Outbreaks Of Dengue And Chikungunya Have Increased In Satara District Satara Health News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT