सातारा

लोकवर्गणीतून कवठे आरोग्य केंद्रास ऑक्‍सिजन मशिन

पुरुषोत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्याने सध्या अनेक गावांतून ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या अत्यवस्थ रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे, त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा ऑक्‍सिजन पुरवठा होवून त्यांचा जीव वाचावा, यासाठी कवठे ग्रामस्थ व रणमर्द मंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्‍सिजन मशिन भेट दिले. 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी कवठे परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. या कोरोना संसर्गात ऑक्‍सिजनशिवाय कोणाला जीव गमवावा लागू नये, यासाठी ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करण्याबाबत केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत कवठे ग्रामस्थ व रणमर्द मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने लोकवर्गणी उभारून प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्‍सिजन मशिन भेट दिले. 

गावाने एकत्रित येत ऑक्‍सिजन मशिन खरेदी करत ते रुग्णसेवेत रुजू केले असून, ही सुविधा सर्वांना विनामूल्य दिली जाणार आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना आधार मिळणार आहे. यावेळी आरोग्य कर्मचारी, गावचे सरपंच श्रीकांत वीर, रणमर्द मंडळाचे अध्यक्ष मयूर डेरे, प्रवीण धेडे, रितेश डेरे, अतुल डेरे, प्रमोद डेरे, उदय पोळ, विश्वास पोळ, सचिन पोळ, निकेश डेरे, चंद्रशेखर डेरे, संकेत हावरे, राकेश डेरे, किरण घाडगे, सुरेंद्र पोळ, विक्रम डेरे, शिवाजी पोळ, संदीप पोळ, विपीन डेरे, आनंदराव डेरे आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT