Oxygen project esakal
सातारा

48 तासांत उभारला 'ऑक्सिजन प्रकल्प' अन् 'सोना'ने वाचवले अनेकांचे प्राण

रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : येथील औद्योगिक वसाहतीमधील सोना अलाईज कंपनीने (Sona Alloys Private Limited Lonand) कंपनी बंद असतानाही केवळ ४८ तासांत ऑक्सिजन प्रकल्प (Oxygen project) सुरू करून जिल्ह्यातील हजारो कोरोना रुग्णांना (Corona Patient) प्राणवायू पुरवून जीवदान दिले. कोरोनात कंपनी व्यवस्थापन व कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद व कायम स्मरणात राहाणारे आहे, असे गौरवोद्गार खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे (Tehsildar Dashrath Kale) यांनी काढले. (Oxygen Supplied By Sona Alloys Company To Corona Patients At Lonand Satara Marathi News)

अनेक आव्हानांवर मात करत ४८ तासांत कंपनीने ऑक्सिजन प्रकल्प सुरू केला. महिनाभरात जिल्ह्यातील १५० हॉस्पिटलला २२ हजार ऑक्सिजनचे सिलिंडर पुरविल्याचे प्रदीप राऊत यांनी सांगितले.

सोना अलाईज कंपनी व्यवस्थापनाने कंपनीतील ऑक्सिजन प्रकल्पामध्ये गेला महिनाभर अहोरात्र यशस्वीरीत्या काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून तहसीलदार श्री. काळे बोलत होते. या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रदीप राऊत (Senior General Manager Pradip Raut), कंपनीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती शहा, प्रा. भीमदेव बुरुंगले, संभाजी घाडगे, बाळासाहेब शेळके, मंडलाधिकारी श्री. पोळ, कंपनीचे सीताराम गिते, अभयसिंह माने, शामजीत नायर, सुभाष कुलकर्णी, निसार खान, अनिकेत शेलार, केतन हिराप, श्री. धर्मेंद्रसिंग, माधवन कुमार, उमेश कांबळी, विजयनन, विश्वनाथ छोटे, ओमकार सावंत आदी उपस्थित होते.

Sona Alloys Company

कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. राऊत म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्या आदेशानुसार आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्या सहकार्याने विविध आव्हानांवर मात करत ४८ तासांत कंपनीने ऑक्सिजन प्रकल्प सुरू केला. महिनाभरात जिल्ह्यातील १५० हॉस्पिटलला २२ हजार ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवू शकली. आता मागणीअभावी प्रकल्प बंद करावा लागत असून, गरज भासल्यास कंपनी यापुढे यापेक्षा अधिक ताकदीने उभी राहील.’’ या वेळी श्री. वायकर, डॉ. शहा, प्रा. बुरुंगले, घाडगे, शेळके, पत्रकार रमेश धायगुडे, शशिकांत जाधव, बिल्कीस शेख आदींनी मनोगते व्यक्त केली. सुभाष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Oxygen Supplied By Sona Alloys Company To Corona Patients At Lonand Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT