सातारा

साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पडळ (ता. खटाव) येथील के. एम. शुगर कारखान्यातील एका विभागाच्या अधिकाऱ्याचा येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. त्यांना मारहाण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी नातेवाईकांशी संवाद साधत जबाब घेण्यात येतील, त्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्‍वासन दिल्यांनतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
 
या घटनेसंदर्भात पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी माहिती दिली. गोवारे येथील जगदीप थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांत प्रोसेसिंग विभागाचे प्रमुख होते. कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून त्यांना जबाबदार धरले होते. त्या कारणावरून थोरात यांना मारहाण झाली आहे. तशा त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. ही घटना काल (ता. 10) रात्री उशिरा घडली. थोरात यांना आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना सकाळी सहा वाजता येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. थोरात यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यादरम्यान पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा केली. जबाब घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट झाल्यानंतर थोरात यांचा मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सायंकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईक गोवारे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले. त्याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपाबाबत जबाब घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असेही पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

MPSC EXAM 2021 : राज्य सरकार आमच्या आयुष्याशी खेळतंय; विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीयेवर पालकमंत्र्यांचे हे विधान

माढ्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू; पंतप्रधान मोदींचे खासदार रणजितसिंहांना आश्वासन 

जगदीप थोरात यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महामुनी व डॉ. धर्माधिकारी यांनी केली. थोरात यांच्या पाठीवर मार लागल्याचे वळ आहेत, असे त्यांच्या उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. तो अहवाल पोलिसांना पाठवला आहे, असे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मारहाणीची सोशल मीडियावर चर्चा 

मायणी : पडळ येथील साखर कारखान्यावर झालेल्या मारहाणीत अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर सुरू होती. त्याबाबतचे वृत्त समाज माध्यमातून जिल्हाभर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. खटाव- माण शुगर साखर कारखान्यातील साखर चोरीच्या संशयावरून या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे समाज माध्यमाद्वारे पसरले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, शीतल पालेकर, तसेच वडूज, औंध, दहिवडी, म्हसवड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी असा फौजफाटा कारखानास्थळी दाखल झाला होता. कऱ्हाड पोलिस ठाण्यात मात्र या गुन्ह्याची अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.

चिंताजनक! कऱ्हाडात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; आरोग्य विभागाकडून जोरदार हालचाली 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT