Laxman Mane esakal
सातारा

NCP : पद्मश्री लक्ष्मण माने राष्ट्रवादीच्या वाटेवर; उद्या मुंबईत करणार पक्षप्रवेश

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे.

सातारा : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरुय. त्यातच आता लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. देशात लोकशाही संस्थांची गळचेपी करुन हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरुय. या कठीण काळात सर्व लोकशाहीवाद्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस अशा पक्षांना शक्ती देणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडक कार्यकर्त्यांसह उद्या सोमवारी (ता. १८) मुंबई इथं राष्ट्रवादी कार्यालयात दुपारी बारा वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत केली.

माने म्हणाले, देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. देशात आगामी काळात लोकशाही जिवंत राहतेय की नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झालीय. यंत्रणांचा वापर करुन पक्ष, संघटना संपवण्याचं काम होत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची ताकद वाढण्याची गरज असून सर्व धर्म समभाव याप्रमाणे गोरगरीबांसाठी झटणार्‍या पक्षांना शक्ती देण्याचा विचार पक्ष संघटनांनी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असून राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. याचे औचित्य साधून ३१ ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त संघटनेचे अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. त्यावेळी अध्यक्षस्थानी कवी डॉ. यशवंत मनोहर उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) प्रमुख पाहुणे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT