सातारा

Prashant Damle: नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पालकांना काय केले आवाहन? वाचा महत्वाची बातमी

Satara News Update | राज्यभरातील नाट्यगृहांची अवस्था सुधारली पाहिजे यासाठी पाठपुरावा करत आहोत

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

karhad News | मराठीमध्ये हलक्या फुलक्या विषयांची दर्जेदार नाटक तयार होत आहेत. भविष्यातील जाणकार प्रेक्षक तयार होण्यासाठी व नाटकाकडे तरुण पिढी येण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आवर्जून नाटक पहायला आणले पाहिजे. तरच तरुणांना नाटक म्हणजे काय हे समजून त्यांचा नाटकाकडे कल वाढेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आज येथे व्यक्त केले.

दै. सकाळ च्यावतीने कऱ्हाड (जि.सातारा) येथे आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल अलंकारमध्ये आयोजित कॉफी विथ कलाकार यामध्ये अभिनेते दामले बोलत होते. अभिनेते विनय येडेकर, सकाळचे व्यवस्थापक राजेश निंबाळकर, चितळे डेअरीचे शरद कुलकर्णी, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑप सोसायटीचे संदिप डाकवे, बचपन स्कुलचे संजय जाधव, रोहन जाधव, हॉटेल अलंकारचे जयदीप अरबुणे, आदी उपस्थित होते.

नाट्य परिषदेच्या माध्यमातून नाट्य जागर ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात घेतली, असे सांगून श्री. दामले म्हणाले, त्यामध्ये राज्यातील १५ ते १६ हजार कलावंतांनी भाग घेतला. त्या माध्यमातून नाट्य चळवळीसंदर्भात हालचाल सुरू झाली. त्यानंतर एकांकिका स्पर्धा घेतल्या. त्या माध्यमातून रस निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सध्या शुन्यापासून सुरू करत आहोत. त्याला यश येत आहे. मुंबईमध्ये नवीन कलाकार येत आहेत. त्यांना सोयी सुविधा देण्यासह त्यांना राहण्याची सोय अल्प दरात करण्याची योजना हाती घेत आहोत. त्याचबरोबर राज्यभरातील नाट्यगृहांची अवस्था सुधारली पाहिजे यासाठी पाठपुरावा करत आहोत.

चित्रपटाचे दोन दोन वर्षे शुटींग चालते. मात्र नाटकाचा अडीच तासात फैसला होतो, असे सांगून अभिनेते विनय येडेकर म्हणाले, नाटक म्हणजे कुटुंबाचा उत्सवच असतो. अभिनय करताना नाटकामध्ये थेट तो करावा लागतो. त्यामुळे पालकांनी मुलांना वाचण्यासाठी चांगली पुस्तके देण्यासोबत नाट्य चळवळ वाढीसाठी मुलांना आवर्जून नाटके पाहण्यासाठी आणले पाहिजे.

----------------------

राज्यकर्त्यांची सढळ हाताने मदत

लोकसभेची निवडणूक होण्याअगोदर राज्य शासनाकडून ही चळवळ वाढण्यासाठी मदत झाली. अर्थसंकल्पात ८५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, विश्वस्त उदय सामंत, ज्येष्ठ नेते शरद पवार हे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी नाटकांवर त्यांचे प्रेम आहे. ते सढळ हाताने मदत करतात. जो कलाकार रंगभूमीवर टिकून काम करेल तोच टिकेल. मराठी नाटकांसाठी कलाकारांनी वेळ द्यावा तरच ही नाट्यचळवळ पुढे जाईल.

----------------

सकाळने दिले नाट्य चळवळीला बळ

सकाळचा नाट्य महोत्सव असला की तो यशश्वी होतोच, असे सांगून श्री. दामले म्हणाले, वृत्तपत्र चालविण्याबरोबरच दै. सकाळने नाट्य महोत्सव आयोजित करून नाट्य चळवळीला बळ दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कऱ्हाडला पहिलाच सकाळ तर्फे नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. इतर सर्व दैनिक सकाळला फॉलो करायला लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नाकटाबाबत आशादायी चित्र निर्माण होत आहे.

----------------------

प्रेक्षकांसाठी आजपर्वणी

दै. सकाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवात उद्या (शनिवार) संकर्षण कऱ्हाडे यांचे नियम व अटी लागू हे नाटक नाट्य रसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात सायंकाळी सात वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT