partially burnt body of youth found near Vanwasmachi crime police satara marathi news Sakal
सातारा

Satara News : वनवासमाचीजवळ युवकाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी समस्या गर्दी झाली

तानाजी पवार

वहागाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वनवासमाची (ता. कराड) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या स्वराज इन्स्टिट्यूटसमोरील नाल्यात युवकाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला.

घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी समस्या गर्दी झाली होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वनवासमाची (ता. कराड) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या स्वराज इन्स्टिट्यूटसमोरील नाल्यातून धूर येत असल्याचे व्यायामासाठी आलेल्या काही ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना व तळबीड पोलिसांना दिली. घटनास्थळी मयताची चप्पल, देशी दारुची बाटली, काड्याची पेटी आदी संशसास्पद गोष्टी आढळून आल्या.

घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तळबीडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी परिसराची पाहणी करुन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना या घटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Oppo Reno 14 Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Oppo Reno 14 सिरीज; 50MP कॅमेरे, 1TB स्टोरेजसह AI फिचर्स अन् किंमत फक्त..

Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश

Crime News: हातगाडीला धडक दिल्याने युवकाला बेदम मारुन ठार केलं; शहरात जातीय तणाव

Imtiaz Jaleel : पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास इम्तियाज जलील यांचा नकार

SCROLL FOR NEXT